आपणास जर marathi blogging करण्याची आवड असेल आणि जर आपण स्वतःचा marathi blog लिहू इच्छित असाल तर आपण खालील काही प्रमुख साधने - tools वापरू शकता, जेणे करून आपण सहजरित्या आपल्या आवडत्या विषयावर marathi blog लिहू शकता.
- मराठी ब्लॉग लिहिण्यासाठी सर्वात महत्वाचे आणि उपयुक्त असे साधन म्हणजेच मराठी भाषा कीबोर्ड -marathi language keyboard, आपणास अत्यंत सोप्या पद्धतीने मराठी लिहिता यावी यासाठी काही कीबोर्ड सुचवीत आहे.
मायक्रोसॉफ्ट भाषा कीबोर्ड (कॉम्पुटर ऑफलाईन टूल) : Microsoft Indic Language Input Tool
मायक्रोसॉफ्ट भाषा कीबोर्ड हे एक सॉफ्टवेअर आहे जे अपल्याला कॉम्पुटर मध्ये इन्स्टॉल करावे लागते, या मराठी कीबोर्ड टूल च्या मदतीने आपण सहजपणे आपल्या computer च्या इंग्रजी किबोर्ड वर इंग्रजी टाइपिंग करून त्याचे मराठीत रूपांतर करू शकतो, आपण जर इंगजीत काही टाईप केले तर हे कीबोर्ड सहज रीतीनें त्याचे रूपांतरित केलेले मराठी शब्द आपणास दाखवते.
उदाहरणार्थ - जर आपण Marathi Blogging असे शब्द कीबोर्ड वर टाईप केले तर त्याचे मराठी रूपांतरित शब्द "मराठी ब्लॉगिंग" असे कम्प्युटर स्क्रीन वर टाईप होते. या कीबोर्ड ची इन्स्टॉलेशन फाईल आपणास मायक्रोसॉफ्ट च्या वैध वेबसाईट वरून डाउनलोड करता येईल, त्या साठी आपल्याला google search engine मध्ये bhasaha input किंवा microsoft bhasha indic tool असे सर्च करावे लागेल, सर्वात प्रथम असलेल्या Microsoft च्या लिंक वरून आपण marathi keyboard टूल डाउनलोड करू शकता.
महत्वाची सूचना - आपल्या कॉम्पुटर च्या OS म्हणजेच Operating System नुसार आपण हे सॉफ्टवेअर डाउनलोड करावे. जसे windows7, windows10 किंवा windows server अथवा अन्य ऑपरेटिंग सिस्टम्स.
गूगल इनपुट टूल्स google input tools
गूगल मराठी इनपुट टूल्स ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
मराठी इंडिया टायपिंग कीबोर्ड (ऑनलाईन) :- Marathi India Typing English to Marathi (Online)
मराठी इंडिया टाइपिंग हे एक ऑनलाईन मराठी टाइपिंग सॉफ्टवेयर आहे, इथे आपण आपल्या कम्प्युटर चा इंग्रजी कीबोर्ड वापरून मराठी सहजपणे टाईप करू शकता, उदाहरणार्थ - आपण इंग्रजी मध्ये काही टाईप केले तर त्यांचे त्वरित मराठी मध्ये भाषांतर होते आणि आपण टाईप केलेला सर्व नमुना save as text ऑप्शन वापरुन notepad format मध्ये सेव करून ठेऊ शकता येते, मराठी इंडिया टाईपिंग हे एक प्रसिद्ध ऑनलाइन tool आहे, या tool मध्ये आपण open in editor option वापरून text ला आपल्याला हवा तसा कलर किंवा हवे तसे फॉरमॅटिंग करू शकता.
मराठी टायपिंग वेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
ही माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद...