WHAT IS CHAT GPT - चॅट जीपीटी म्हणजे काय


नमस्कार मित्रानो,

आपण CHAT GPT बद्दल ऐकलंच असेल, परंतु काहींना प्रश्न पडतो की WHAT IS CHAT GPT म्हणजेच चॅट जीपीटी म्हणजे नक्की काय, तर या सत्रामध्ये आपण चॅट जीपीटी बद्दल जाणून घेऊ.

CHAT म्हणजे जसे आपण एखाद्या व्यक्ती सोबत व्हाट्ससअप्प किंवा टेलिग्राम ॲप वर ज्या प्रमाणे टेक्स्ट मध्ये बोलतो त्याला CHAT असे बोलतात आणि GPT चे पूर्ण संबोधन आहे जनरेटीव प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर, प्री ट्रेंन म्हणजे ज्याला आधी पासूनच ट्रेनिंग दिलेली आहे असा आणि ट्रान्सफॉर्मर म्हणजे बदलणारा, म्हणजे अशी मशीन जी तुमचे बोलणे ऐकून तुम्हाला त्यावर त्याच्याकडे असलेल्या माहिती च्या आधारे त्वरित उत्तर देते.

तुम्ही त्याला तुमच्या गरजेनुसार प्रश्न विचारू शकता, अशा मशीन ला चॅट बोट बोलले जाते, हे असे कम्प्युटर प्रोग्राम असतात जे आपण विचारलेल्या प्रश्नावर विचार करून त्याचे अचूक उत्तर देतात. अशा चॅट बोटना त्या प्रकारे प्रोग्राम केलेले असते.

आपण समजून घेऊ की हे चॅट बोट नक्की काम कसे करतात.

जर आपल्याला कुणी काही प्रश्न विचारला तर आपण सर्वात आधी समोरचा मनुष्य काय बोलत आहे ते ऐकुन घेतो मग त्यावर विचार करतो त्यानंतर समोरच्या मनुष्याला त्यावर उत्तर देतो. चॅट बोट देखील आपण त्याला काय विचारतो त्यावर तो विचार करून आपल्याला उत्तर देतो, आता तुम्ही विचार कराल की Chat GPT कढे ही शक्ती कशी आली तर त्याच सर्व साधारण उत्तर आहे.

आर्टिफिशिअल इंटेलीजन्स (Artificial Intelligence) ज्याचे संक्षिप्त नाव आहे ऐ आई (AI).

आता थोडक्यात जाणून घेऊया की आर्टिफिशिअल इंटेलिजन्स नक्की काय आहे.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स एक अस तंत्रज्ञान आहे जे स्वतः विचार करू शकते त्याच प्रकारे स्वतःहून स्वतःला अपडेट करू शकते, उदाहरणार्थ आपण आपल्या अँड्रॉइड फोन मध्ये गुगल ला सांगतो की अमूक माणसाला फोन कर किंवा अमुक गाणं ऐकव तर गूगल आपलं ते काम सहज ऐकतो आणि कृती अमलात आणतो, आपल्या अँपल फोन मध्ये तेच काम सिरी करते, CHAT GPT सुद्धा तेच काम AI च्या मदतीने करतो, AI कडे रिऍक्टिव्ह नेचर असते, आपण विचारलेल्या प्रश्नाचं त्वरित उत्तर देण्याचा हजरजबाबी पणा त्याच्या कडे असतो.


आता समजून घेऊ की या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) कडे हा सर्व डेटा कुठून येतो तर त्याचे उत्तर आहे मनुष्य. हो आपणच त्यांच्या सिस्टिम मध्ये हा डेटा अपलोड करत असतो, कारण AI कडे स्वतःहून शिकण्याची कला अवगत आहे, AI ला हा सर्व डेटा त्याच्या प्रोग्रामर द्वारे मोठ्या प्रमाणात अपलोड केला जातो, आता आपण परत वळूया चाट CHAT GPT विषयावरआपण जे प्रश्न CHAT GPT ला विचारतो तसे तो त्याची उत्तरे त्याच्या कडे असलेल्या माहिती च्या आधारे आपल्याला देतो.

जर आपण त्याला सांगितलं की एखादी नवीन कविता लिहून दे तर तो आपल्याला एका मिनिटाच्या आतच नवीन कविता लिहून देतो, जर तुम्ही त्याला विचारलं की महात्मा गांधी या विषयावर निबंध लिहून दे तर तो दुसऱ्या मिनिट मध्येच तुम्हाला निबंध लिहून देतो, तुम्ही जेवढ्या शब्दामध्ये सांगाल तेवढ्या शब्दामध्ये तो तुम्हाला निबंध लिहून देईल,

उदाहरणार्थ जर तुम्ही त्याला सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर १००० शब्दामध्ये निबंध लिहून दे तर CHAT GPT महाराजांच्या कारकिर्दीमधले ५ मुद्दे तुम्हाला प्रत्येकी २०० शब्दामध्ये बनवून देतो. उत्तर दिल्या नंतर तो आपल्याला विचारतो की त्याने दिलेल्या उत्तरा मध्ये काही चुकीचं असेल तर आपण त्याला दिलेल्या फीडबॅक नुसार तो स्वतःला उपडेट करून पुढील वेळेला आपल्याला उपडेट केलेलं उत्तर देतो.


CHAT GPT बनविणाऱ्या कंपनीच नाव OPEN AI आहे, सन २०१५ मध्ये सॅम ऑल्टमॅन-SAM ALTMAN आणि एलोन मस्क-ELON MUSK या दोघांनी मिळून या कंपनी ची सुरुवात केली,
हो तेच एलोन मस्क टेस्ला आणि ट्विटर कंपनी चे मालक पण ते आता OPEN AI कंपनीचा भाग नाहीत, आता सध्या OPEN AI - CHAT GPT ची ४ क्रमांकाची आवृत्ती (version ) चालू आहे, सध्या चे हे version सप्टेंबर २०२१ च्या डेटावर आपल्याला टेक्स्ट स्वरूपात उत्तरे देतो. रिअल टाइम माहिती OPEN AI कडे सध्या उपलब्ध नाही, शक्यतो पुढे येणाऱ्या version मध्ये रिअल टाइम माहिती देण्याची सुविधा येऊ शकते.


आता पर्यंत मायक्रोसॉफ्ट (Microsoft) या जग विख्यात कंपनी ने OPEN AI मध्ये तब्बल १३ बिलियन म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सुमारे १०७ करोड ची गुंतवणूक केली आहे, यावरून आपणास लक्षात येते की भविष्यात OPEN AI ही कंपनी यशस्वी वाटचाल करू शकते.


मनुष्यबळ म्हणजेच आपण ज्याला ह्यूमन पॉवर म्हणतो त्यावर CHAT GPT चा मुख्यतः परिणाम होणार आहे, मोठं मोठ्या कंपनी ना लागणारे content writing आता CHAT GPT मुळे सहज लिहिणे शक्य झाले आहे.


सध्या OPEN AI - CHAT GPT चे कुठलेही ही ॲप उपलब्ध नसून ते फक्त वेब ब्राऊसर वर मोफत वापरण्यास उपलब्ध आहे, शक्यतो भविष्यात या साठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील, जो पर्यंन्त CHAT GPT मोफत वापरण्यास मिळत आहे तो पर्यंत तुम्ही त्याचा पुरेपूर वापर करून घ्यावा.



CHAT GPT वापरण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या Google /Microsoft/Apple Account ने लॉगिन करावी लागेल, .तसेच आपल्या contact number वर आलेला ओटीपी verified करावा लागतो.




OPEN AI CHAT GPT ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा.





मित्रहो ही माहिती वाचल्या बद्दल धन्यवाद.

Post a Comment

Previous Post Next Post