Marathi Bloggers List - मराठी ब्लॉगर्स लिस्ट




नमस्कार मित्रांनो,

आज आपण महाराष्ट्रातील काही महत्वाच्या मराठी ब्लॉगर्स Top Marathi Bloggers ची माहिती जाणून घेणार आहोत.

अक्षय रासकर - Akshay Raskar - Marathi Blogger

मराठी ब्लॉगिंग च्या जगात आज काल एक नाव प्रामुख्याने घेतले जाते ते म्हणजे अक्षय रासकर.

बीड जिल्ह्यातील कोळगाव येथील अक्षय रासकर यांनी वयाच्या ३३ व्या वर्षा पासून मराठी ब्लॉग लिहिण्यास सुरुवात केली, पुणे येथे इंजींनीयरिंग केलेले आणि प्रायवेट कंपनी मध्ये काम करणारे अक्षय यांनी नोकरी सोडून ब्लॉगिंग च्या जगात प्रवेश केला.

एका साधारण शेतकर्‍याचा मुलगा असलेल्या अक्षय ने नोकरी सोडल्यानंतर नाशिक येथे जाऊन गरीब शेतकर्‍यांसाठी भारतीय जुगाड हा विडियो बनवून यूट्यूब वर अपलोड केला, हा विडियो तब्बल ५० लाखाहून अधिक लोकांनी पहिला, त्यांनंतर देखील अक्षय यांनी शेतकर्‍यांच्या मदती साठी अनेक विडियो यूट्यूब वर अपलोड केले आहेत.

अक्षय यांनी त्यांचा technical support नावाचा यूट्यूब चॅनेल चालू केला आणि त्यावर शेतकर्‍यांसाठी गरज असलेले विडियो जसे सरकारी सूचना आणि योजना या सारखे विडियो अपलोड केल, भारतातील तरुणांनी त्यांच्या विडियोस चे कौतुक केले.

अक्षय यांनी ब्लॉगिंग ची कला स्वता:पर्यन्त मर्यादित न ठेवता ही कला त्यांच्या गावातील काही हुशार तरुणांना देखील शिकवली आणि आज ते तरुण सुद्धा ब्लॉगिंग च्या क्षेत्रात नाव गाजवत आहेत तसेच प्रतिमाह लाखो रुपये कमवत आहेत.

अक्षय यांनी त्यांच्या गावात म्हणजेच कोळगाव येथे mahi groups and company - be stronger than your excuses (माही ग्रुप्स अँड कंपनी) या नावाने ऑफिस सुरू केले आहे, तिथून च ते यूट्यूब  विडियो आणि ब्लॉग प्रसारित करतात.

अक्षय रासकर यूट्यूब चॅनेल लिंक 

अक्षय रासकर इंस्टाग्राम लिंक



अमोल केळकर - Amol Kelkar

मित्रांनो अमोल केळकर हे नाव तुम्हाला ब्लॉगिंग मध्ये नविन वाटेल परंतु अमोल केळकर हे २०११ पासून त्यांच्या ब्लॉगर च्या ब्लॉग वर त्यांनी बनविलेल्या कविता (poems) पोस्ट करत आहेत, त्यांनी कुठल्याही प्रकार ची जाहिरात न केल्याने त्यांचा ब्लॉग फारसा प्रसिद्ध नाही.

अमोल केळकर हे माझी टवाळखोरी या नावाने त्यांच्या ब्लॉग वर कविता पोस्ट करतात. त्यांनी २०११ पासून आज पर्यन्त शेकडो कविता पोस्ट केल्या आहेत.

आपण त्यांच्या ब्लॉग वर भेट देऊन त्यांच्या दैनंदिन जीवनावर आधारित कविता वाचू शकता.

अमोल केळकर यांच्या ब्लॉग ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा 


मराठी ब्लॉग लिहण्यास काही तांत्रिक सूचना इथे वाचा

ही माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद...


Post a Comment

Previous Post Next Post