Akash Popalghat - आकाश पोपळघट

 


Akash Popalghat MIT -
Massachusetts Institute of Technology - आकाश पोपळघट - मॅसाच्युसेट्स इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि


जगातील सर्वात प्रख्यात असलेल्या अमेरिकेतील एमआयटी (मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) MIT - Massachusetts Institute of Technology या विद्यापीठामध्ये प्रती वर्षी जगभरातून फक्त ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो, २०२२ मध्ये या विद्यापीठामध्ये प्रवेशाचा बहुमान मिळालेला भारतातील एकमेव विद्यार्थी आहे आकाश पोपळघट.


महाराष्ट्र राज्यातील हिंगोली तालुक्यातील सेनगाव गावामधील  शेतकरी कुटुंबात १९९७ साली आकाश चा जन्म झाला, आकाश चे वडील गजाजन आणि आई लक्ष्मी यांनी आकाश च्या शिक्षणासाठी खूप मेहनत केली,त्याचे इयत्ता चौथी पर्यन्त चे शिक्षण कहाकर येथे झाले, आकाशच्या इंग्रजी विषयात असलेल्या आवडी  मुळे त्याच्या दहावी पर्यन्त च्या शिक्षणासाठी रिसोड येथील सेमी इंग्लिश स्कूल मध्ये त्याचे ऍडमिशन घेतले गेले, दहावी पर्यन्त शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालियन शिक्षणासाठी आकाश राजस्थान मधील कोटा येथे गेला, तिथे सायन्स चे शिक्षण घेत असताना आकाश ला एमआयटी MIT ची ओळख झाली. आकाश ने त्यानंतर दररोज २०-२० तास अभ्यास करून एमआयटी MIT ची  परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्याला MIT मधून ऍडमिशन घेण्यासाठी पत्र आले, घरची परिस्थिति हलाखी ची असल्या कारणाने अमेरिकत जाऊन राहणे आकाश ला शक्य नव्हते परंतु योग्य वेळेस आकाश ला भारतातील काही पतसंस्थानी आर्थिक मदत केली आणि त्याचे MIT मध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले. 

आकाशच्या या यश बद्दल महाराष्ट्र राज्यातील अनेक मान्यवरांनी त्याचा सत्कार केलेला आहे.  



आकाश सध्या २७ वर्षाचा असून तो MIT विद्यपीठ येथे पुढील शिक्षण घेत आहे.



आकाश सध्या सोशल मीडिया वर चर्चेत आहे.

आपल्या माहिती साठी त्याचे वापरात असलेले सोशल मीडिया पेज खाली देत आहोत. 
 






ही माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद...




Post a Comment

Previous Post Next Post