खाशाबा दादासाहेब जाधव Khashaba Dadasaheb Jadhav ( K.D.JADHAV) हे नाव भारतीय कुस्ती मधील नावाजलेले नाव आहे, खाशाबा यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ मध्ये महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोळेश्वर या गावी शेतकरी कुटुंबात झाला, सहा भावंडामध्ये खाशाबा सर्वात लहान होते , त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिति ठीक नसताना ही त्यांचे वडील म्हणजेच दादासाहेब जाधव khashaba jadhav father हे स्वत: एक कुस्ती प्रशिक्षक होते त्यांनी खाशाबा यांना शैक्षणिक आणि क्रीडाविषयक छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिले, त्यांनी खाशाबा यांना वयाच्या ५ व्या वर्षा पासूनच कुस्तीचे पूर्व शिक्षण देण्यास सुरुवात केली होती, खाशाबा यांचा प्राथमिक शिक्षा घेण्यासाठी ग्रामीण शाळेत प्रवेश घेतला गेला , त्या नंतर त्यांनी कराड जिल्यातील बहुतांश शाळेमध्ये आयोजित कुस्ती स्पर्धेचे प्रतिनिधित्व करून आपले आणि आपल्या शाळेचे नाव गाजविले.
महाविद्यालयीन शिक्षण घेताना बाबूराव बळवडे आणि बेलापुरी गुरुजी यांनी खाशाबा यांना मार्गदर्शन केले, खाशाबा यांनी १९४७ साली झालेल्या भारत छोडो आंदोलनात सुद्धा भाग घेतला होता, सन १९४७ मध्ये भारत देश स्वातंत्र झाल्या नंतर १९४८ पासून खाशाबा यांनी त्यांच्या कुस्ती मधील आंतर्राष्ट्रीय करियर ची सुरुवात केली, १९४८ साली लंडन येथे आयोजित ऑलिम्पिक स्पर्धेत फ्लायवेट प्रकारात खाशाबा हे ६ व्या स्थानावर आले,त्या काळीआंतरराष्टीय कुस्तीचे नियम कडक असताना देखील ६ व्या क्रमांकावर स्थान मिळवणे ही देखील मोठ्या शर्तीची कामगिरी होती, १९४८ साली ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेतील वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या रीस गार्डनर Rees Gardner यांनी खाशाबा यांना प्रशिक्षण दिले, त्यांच्या लंडन प्रवासाचा खर्च त्या काळी कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरे शहाजी राजे भोसले यांनी केला होता.
पुढील चार वर्षे त्यांनी कठीण परिश्रम करून १९५२
साली आयोजित हेलसिंकी समर ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेतला, हेलसिंकी ही फिनलँड देशाची
राजधानी आहे,
Helsinki is capital of Finland country, खाशाबा यांनी bantamweight category (५२ ते ६२ किलो) मध्ये
स्वतंत्र भारताला कास्य पदक (Bronze Medal) मिळवून दिले,आपल्या भारत देशाला स्वातंत्र्या नंतर कुस्ती मध्ये
कास्य पदक मिळवुण देणारे ते प्रथम खेळाडू आहेत, या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाला सुवर्ण पदक Gold Medal मिळाले होते.खाशाबा जाधव यांना ‘पॉकेट डायनॅमो’ या नावाने ओळखले जात होते.
१४ ऑगस्ट १९८४ या दिवशी वयाच्या ५८ व्या वर्षी खाशाबा
यांचे एका मोटरसायकल अपघातात निधन झाले
- महाराष्ट्र सरकारने १९९२-१९९३ मध्ये मरणोत्तर छत्रपती पुरस्कार दिला.
- २००० साली त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- १५ जानेवारी २०२३ रोजी, Google ने जाधव यांना त्यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त Google Doodle द्वारे सन्मानित केले.
- सन २००७ मध्ये संजय दुधाणे यांनी खाशाबा यांच्या जीवनावर चरित्र लिहिले त्याचे नाव ऑलिम्पिकवीर के डी जाधव - Olympicveer K. D. Jadhav आहे.
- नागराज मंजुळे हे प्रख्यात दिग्दर्शक खाशाबा यांच्या जीवनावर चित्रपट काढणार आहेत.
- प्रसिद्ध नायक आणि निर्माते रितेश देखमुख Ritesh Deshmukh हे सुद्धा खाशाबा यांच्या जीवनावर चित्रपट काढण्याच्या विचारात आहेत.