नमस्कार मित्रांनो,
महाराष्ट्र भूमी ही पावन संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, तसेच महाराष्ट्रातील देवस्थाने ही जागृत असून अखंड भारतातुन तसेच परदेशातून भक्तगण महाराष्ट्रातील मंदिरांना भेट देण्यासाठी तसेच आपल्या इष्ट देवतांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात, आम्ही इथे महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध देवस्थनांमध्ये उपलब्ध असलेले ऑनलाइन लाईव दर्शन आपणासाठी उपलब्ध करून देत आहोत, जेणे करून जे भक्त आपल्या इष्ट देवस्थाना पर्यन्त पोहोचू शकत नाहीत ते घर बसल्या या देवस्थानाचे दर्शन घेऊ शकतात.
श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर महाराष्ट्र - Shree Karveer Nivasini Mahalaxmi Kolhapur Today Live - Mahalaxmi Kolhapur Live Darshan - कोल्हापूर महालक्ष्मी लाईव्ह दर्शन
श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे आहे, कोल्हापूर ला करवीर नगरी असे सुद्धा म्हटले जाते, कोल्हासूराच्या मुलाचा म्हणजेच करवीर चा वध शिव शंकरानी या भूमी मध्ये केला तेव्हा करवीर च्या इच्छेनुसार या नगरीला करवीर नगरी असे नाव पडले, साक्षात शिव शंकरांचा येथे वास असल्यामुळे करवीर नगरीला दक्षिण काशी असे सुद्धा म्हटले जाते.
श्री महालक्ष्मी मंदिर हे पुराणात उल्लेख केलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवींच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. हे मंदिर इ.स.६३४ साली चालुक्य राजा कर्णदेव यांनी बांधले आहे, मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झाले. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, तसेच ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून महालक्ष्मी अंबाबाई मंदिराचे पुरातन तत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते.

Kolhapur Mahalaxmi Live Darshan - कोल्हापूर महालक्ष्मी लाईव्ह दर्शन कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाई लाईव्ह दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा
श्री तुळजाभवानी मंदिर तूळजापूर महाराष्ट्र - Tuljabhavani Tuljapur Today Live - Tuljabhavani Tuljapur Live Darshan - तुळजापूर तुळजाभवानी लाईव्ह दर्शन
तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील जागृत देवस्थान आहे, तुळजाभवानी ही महाराष्ट्रची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते, छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नित्या नियमाने जात असत, महाराष्ट्र जिल्ह्यातील साडेतीन शक्ति पीठापैकी श्री क्षेत्र तुळजापुर हे एक शक्ति पीठ मानले जाते, तुळजाभवानी ही स्वराज्य संस्थापक राजे शिव छत्रपती यांची आराध्य देवता असून तिला भवानी देवी म्हणून संबोधले जाते.
तुळजाभवानी देवी कडून श्री छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद मिळाला होता.तुळजाभवानी मंदिराची रचना हेमाडपंती असून पुरातत्व दृष्ट्या हे मंदिर यादवकालीन मानले जाते, या मंदिराचे धार्मिक पूजेचे आणि पुरोहितांचे अधिकार पाळीकर भोपे कुटुंबाकडे आहे.
मुंबादेवी ही मुंबई ची ग्रामदेवता मानली जाते, मुंबई शहराला मुंबई हे नाव मुंबादेवी च्या नावावरुन च पडले आहे,
मुंबादेवी ही मासेमारी करणार्या कोळ्यांची देवता होती, सर्वप्रथम मुंबादेवी मातेचे देऊळ मुंबई मधील सध्या असलेल्या फोर्ट भागात होते, परंतु ज्या वेळी इंग्रजांनी व्हिक्टोरिया टर्मिनस रेल्वे स्टेशन बांधायचे ठरवले त्या वेळेस हे मंदिर काढून ते मुंबई च्या सध्या असलेल्या भुलेश्वर - काळबादेवी भागात बांधून दिले, हे मंदिर सुमारे सहा शतके जुने आहे.
सध्याच्या मंदिरात डोक्यावर चांदीचा मुकुट आणि नाकामध्ये नथ घातलेली मुंबादेवीची मूर्ति आपणास पहावयास मिळेल, मुंबादेवीच्या शेजारीच श्री देवी जगदंबा अन्नपुर्णेची मूर्ति आहे.
सप्तश्रृंगी देवी हे नाशिक जिल्ह्यातील वणी येथील जागृत देवस्थान आहे, सप्तश्रृंगी माता ही देवी दुर्गा सप्तशती आणि देवी भागवत या दोन्ही ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या माहिती प्रमाणे १०८ पिठापैंकी आणि महाराष्ट्रात असलेल्या देवींच्या साडेतीन पिठापैंकी आद्य शक्तीपीठ आहे, अर्थात सप्तश्रृंगी देवी मूळ शक्तीपीठ आहे, या अठरा हाताच्या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशविदेशातून भाविक येत असतात.
सप्तश्रृंगी गड हा नाशिक मध्ये वणी येथे असलेल्या नांदुरी गावाजवळ असून अनेक गावांची सप्तश्रृंगी देवी ही आराध्य दैवत आहे, श्री ब्रम्हदेवांच्या कमंडलू मधून निघालेल्या श्री गिरीजा नदीचे रूप श्री देवी सप्तश्रृंगी आहे असे मानले जाते, आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे, या देवीची मूर्ति ही स्वयंभू असून देवीची मूर्ति ९ फूट उंच आहे, तसेच या देवीने हातामध्ये निरनिराळी आयुधे धारण केलेली आहेत.
"कानडा राजा पंढरीचा" श्री देव विठ्ठल यांचा संबंध कन्नड म्हणजेच कर्नाटक प्रांत आणि कृष्णदेवराय यांच्याशी असल्यामुळे श्री विठ्ठलांना कन्नड प्रांताचा राजा असे संबोधले जाते.
कोट्यवधी भाविकांच आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलांच प्रसिद्ध मंदिर हे सोलापूर जिल्यातील पंढरपूर क्षेत्री आहे, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील आषाढी म्हणजेच देवशयनी एकादशीला पंढरपूरला भक्तगण लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी येत असतात, सोळाव्या शतकात विजयनगरच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठ्ठलाची मूर्ति आपल्या राज्यात नेली होती, कदाचित म्हणूनच विठ्ठलाला कानडा राजा पंढरीचा असे संबोधले जात असावे, नंतर श्री संत एकनाथ यांचे पणजोबा श्री भानुदास यांनी विठ्ठलाची मूर्ति परत पंढरपूरात आणली. श्री विठ्ठलाच हे मंदिर १६ किंवा १७ शतकातील बांधकाम असावं अस काही जाणकारांच मत आहे.
Vitthal Rukmini Mandir Live Darshan - विठ्ठल रखुमाई मंदिर पंढरपूर लाईव्ह दर्शन
जेजूरी चे खंडोबा मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रापैकी एक आहे, हे मंदिर पुणे येथील जेजूरी गावात डोंगरावर असून या क्षेत्राला जेजूरी गड असे ही म्हटले जाते, तसेच या क्षेत्राला खंडोबाची जेजूरी असे ही म्हणतात,हे मंदिर काळ्या दगडा पासून बनवले असून यात खंडोबा आणि त्यांची पत्नी म्हाळसा यांच्या मूर्ति आहेत, खंडोबाची मूर्ति ही अश्वारूढ म्हणजेच घोड्यावर स्वार झालेली आहे, या मंदिरात भक्तगण हळद आणि खोबरे नारळ याचा भंडारा हवेत उधळतात कारण खंडोबा देवाला भंडारा प्रिय आहे, हे मंदिर डोंगरावर असून डोंगराच्या पथ्य पासून मंदिरं पर्यन्त जाण्यासाठी २०० हून अधिक पायर्या आहेत, मांदिरात जाताना वाटेत बानाई म्हणजेच खंडोबाची दुसरी पत्नी हिचे मंदिर आहे.
खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे म्हणून च खंडोबाचा उपवास हा रविवार च्या वारी केला जातो, मराठा, कुणबी,धनगर,आगरी,कोळी तसेच इतर अनेक लोकांचे खंडोबा हे कुलदैवत असून इसवी सन १६०८ मध्ये या मंदिराचे बांधकाम झाले आहे.
खंडोबा हे साक्षात शिवाचा अवतार आहेत याची कथा अशी आहे की एकदा मनी आणि मल्ल या दोन राक्षस भावांनी श्री ब्रह्मदेवांची तपस्या करून त्यांच्या कडून वरदान मिळाल्या वर पृथ्वी वरील लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली , त्यांच्या दोघांच्या संहारासाठी प्रभू शिव शंकरानी खंडेरायाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला, त्यांनी मनी आणि मल्ल यांच्या सोबत घनघोर युद्ध केले त्यात खंडोबाने मल्ल याचा संहार केला आणि मनी हा शरण आल्यामुळे त्याला जीवनदान दिले, मल्लाचा संहार केल्यामुळेच खंडोबाना मल्ल हारी म्हणजेच मल्हारी असे देखील म्हटले जाते.
तुळजाभवानी देवी कडून श्री छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद मिळाला होता.तुळजाभवानी मंदिराची रचना हेमाडपंती असून पुरातत्व दृष्ट्या हे मंदिर यादवकालीन मानले जाते, या मंदिराचे धार्मिक पूजेचे आणि पुरोहितांचे अधिकार पाळीकर भोपे कुटुंबाकडे आहे.
तुळजापूर तुळजाभवानी लाईव्ह दर्शन घेण्यासाठी लिंक न. १ येथे क्लिक करा
तुळजापूर तुळजाभवानी लाईव्ह दर्शन घेण्यासाठी लिंक न. २ येथे क्लिक करा
श्री मुंबादेवी मंदिर मुंबई महाराष्ट्र - Mumbadevi Mandir Today Live - Mumbadevi Mumbai Live Darshan - मुंबादेवी मंदिर लाईव्ह दर्शन
मुंबादेवी ही मासेमारी करणार्या कोळ्यांची देवता होती, सर्वप्रथम मुंबादेवी मातेचे देऊळ मुंबई मधील सध्या असलेल्या फोर्ट भागात होते, परंतु ज्या वेळी इंग्रजांनी व्हिक्टोरिया टर्मिनस रेल्वे स्टेशन बांधायचे ठरवले त्या वेळेस हे मंदिर काढून ते मुंबई च्या सध्या असलेल्या भुलेश्वर - काळबादेवी भागात बांधून दिले, हे मंदिर सुमारे सहा शतके जुने आहे.
सध्याच्या मंदिरात डोक्यावर चांदीचा मुकुट आणि नाकामध्ये नथ घातलेली मुंबादेवीची मूर्ति आपणास पहावयास मिळेल, मुंबादेवीच्या शेजारीच श्री देवी जगदंबा अन्नपुर्णेची मूर्ति आहे.
मुंबादेवी मुंबई लाईव्ह दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा
श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवी वणी नाशिक महाराष्ट्र - Saptashrungi Nivasini Devi Vani Nashik Today Live - Saptashrungi Devi Live Darshan - सप्तश्रृंगी लाईव्ह दर्शन
सप्तश्रृंगी गड हा नाशिक मध्ये वणी येथे असलेल्या नांदुरी गावाजवळ असून अनेक गावांची सप्तश्रृंगी देवी ही आराध्य दैवत आहे, श्री ब्रम्हदेवांच्या कमंडलू मधून निघालेल्या श्री गिरीजा नदीचे रूप श्री देवी सप्तश्रृंगी आहे असे मानले जाते, आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे, या देवीची मूर्ति ही स्वयंभू असून देवीची मूर्ति ९ फूट उंच आहे, तसेच या देवीने हातामध्ये निरनिराळी आयुधे धारण केलेली आहेत.
Saptashrungi Vani Nashik Live Darshan - सप्तश्रृंगी देवी वणी नाशिक लाईव्ह दर्शन
सप्तश्रृंगी वणी नाशिक लाईव्ह दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा
श्री विठ्ठल मंदिर क्षेत्र पंढरपूर महाराष्ट्र - Shree Vitthal Pandharpur Today Live - Pandharpur Vitthal Rukmini Live Darshan - विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन
कोट्यवधी भाविकांच आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलांच प्रसिद्ध मंदिर हे सोलापूर जिल्यातील पंढरपूर क्षेत्री आहे, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील आषाढी म्हणजेच देवशयनी एकादशीला पंढरपूरला भक्तगण लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी येत असतात, सोळाव्या शतकात विजयनगरच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठ्ठलाची मूर्ति आपल्या राज्यात नेली होती, कदाचित म्हणूनच विठ्ठलाला कानडा राजा पंढरीचा असे संबोधले जात असावे, नंतर श्री संत एकनाथ यांचे पणजोबा श्री भानुदास यांनी विठ्ठलाची मूर्ति परत पंढरपूरात आणली. श्री विठ्ठलाच हे मंदिर १६ किंवा १७ शतकातील बांधकाम असावं अस काही जाणकारांच मत आहे.
Vitthal Rukmini Mandir Live Darshan - विठ्ठल रखुमाई मंदिर पंढरपूर लाईव्ह दर्शन
विठ्ठल रुक्मिणी पंढरपूर लाईव्ह दर्शन घेण्यासाठी लिंक -१ येथे क्लिक करा
विठ्ठल रुक्मिणी पंढरपूर लाईव्ह दर्शन घेण्यासाठी लिंक -२ येथे क्लिक करा
श्री खंडोबा जेजूरी क्षेत्र महाराष्ट्र - Shree Khandoba Jejuri Live - Khandoba Malhari Martand Live Darshan - जेजूरी गड लाईव्ह दर्शन
खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे म्हणून च खंडोबाचा उपवास हा रविवार च्या वारी केला जातो, मराठा, कुणबी,धनगर,आगरी,कोळी तसेच इतर अनेक लोकांचे खंडोबा हे कुलदैवत असून इसवी सन १६०८ मध्ये या मंदिराचे बांधकाम झाले आहे.
खंडोबा हे साक्षात शिवाचा अवतार आहेत याची कथा अशी आहे की एकदा मनी आणि मल्ल या दोन राक्षस भावांनी श्री ब्रह्मदेवांची तपस्या करून त्यांच्या कडून वरदान मिळाल्या वर पृथ्वी वरील लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली , त्यांच्या दोघांच्या संहारासाठी प्रभू शिव शंकरानी खंडेरायाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला, त्यांनी मनी आणि मल्ल यांच्या सोबत घनघोर युद्ध केले त्यात खंडोबाने मल्ल याचा संहार केला आणि मनी हा शरण आल्यामुळे त्याला जीवनदान दिले, मल्लाचा संहार केल्यामुळेच खंडोबाना मल्ल हारी म्हणजेच मल्हारी असे देखील म्हटले जाते.
Khandoba Mandir Jejuri Live Darshan - खंडोबा मंदिर जेजूरी लाईव्ह दर्शन
Jyotiba Mandir Kolhapur Live Darshan - ज्योतिबा मंदिर कोल्हापूर लाईव्ह दर्शन
Siddhivinayak Mandir Mumbai Live Darshan - सिद्धिविनायक मंदिर मुंबई लाईव्ह दर्शन
महत्वाची सूचना - ऑनलाइन लाईव्ह दर्शनाचे तसेच लाईव्ह स्ट्रीम चे सर्व हक्क संबधित देवस्थानाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत, भविष्यात झालेले बदल या वेबसाइट वर अपडेट करण्यात येतील, तसेच आपणास अन्य देवस्थानांचे लाईव्ह दर्शन पहावयाचे असल्यास कमेन्ट बॉक्स मध्ये मेसेज करावा. उपलब्ध असलेल्या देवस्थानांचे लाईव्ह स्ट्रीम अपडेट करण्यात येईल.
जेजूरी खंडोबा मंदिर लाईव्ह दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा
श्री ज्योतिबा मंदिर कोल्हापूर महाराष्ट्र - Shree Jyotiba Kolhaur Live - Jyotiba Mandir Kolhapur Live Darshan - ज्योतिबा कोल्हापूर लाईव्ह दर्शन
ज्योतिबा मंदिर महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आहे, ज्योतिबा देवाला ज्योतिर्लिंग, केदारलिंग असेही म्हणतात.
कोल्हापूर पासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर ज्योतिबा देवाचा डोंगर आहे, ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी असेही म्हणतात.
ज्योतिबा म्हणजेच केदार देवाचा उल्लेख हा यादवपुर्व काळात सुद्धा आढळतो, खोलेश्वराच्या शिलालेखातही केदारेश्वराचा उल्लेख आहे, ज्योतिबा डोंगरावर केदारलिंग केदारेश्वर आणि रामलिंग अशी तीन मंदिरे आहेत, ज्योतिबा हे दैवत साक्षात शिवाचे आणि सूर्याचे रूप मानले जाते.
प्राचीन काळी कोल्हापूर येथे दैत्यांनी हाहाकार माजविला होता, कोल्हापूर येथील जनता दैत्यांना कंटाळली होती, कोल्हापूर च्या अंबाबाईला सुद्धा दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली, राक्षसांच्या त्रासाला कंटाळून आणि जनतेची दैत्यांच्या छळातून सुटका करण्यासाठी श्री महालक्ष्मी ने केदारेश्वराची आराधना करून तपस्या केली आणि केदारेश्वरला राक्षसांचा संहार करण्याची विनंती केली, केदारेश्वरांनी राक्षसा सोबत युद्ध करून रत्नासुर नावाच्या मुख्य राक्षसाचा वध या डोंगरावर केला म्हणून या डोंगराला वाडी रत्नागिरी असे म्हणतात, रत्नासूराच्या वधानंतर अंबाबाई ने केदारेश्वराना प्राथना केली आणि सदैव तुझी कृपा दृष्टी माझ्यावर असुदे अशी विनंती केली, देवी अंबाबाईच्या रक्षणासाठी ज्योतिबा कायम स्वरूपी तिथेच राहिले म्हणून च ज्योतिबाच्या मंदिराच तोंड अंबाबाई च्या देवळाकडे दक्षिणमुखी आहे.
ज्योतीबांची मूर्ति काळ्या पाषाणात असून मूर्तीच्या हातात खडग, पानपात्र डमरू त्रिशूळ आहे, ज्योतीबाचा रक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस आहे, ज्योतिबाचे दर्शन घेण्याआधी काळभैरवाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे,
ज्योतिबा केदारेश्वर मंदिर कोल्हापूर लाईव्ह दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा
श्री साईबाबा मंदिर क्षेत्र शिर्डी महाराष्ट्र - Saibaba Shirdi Live - Shirdi Saibaba Mandir Live Darshan - शिर्डी साईबाबा लाईव्ह दर्शन
श्री साईबाबा हे एक अवलिया होते, अहमदनगर जिल्ह्यात राहाता तालुक्यातील शिर्डी गावात साईबाबांचे वास्तव्य होते म्हणून साईबाबांना शिर्डी चे साईबाबा असे देखील म्हणतात, साईबाबांनी लोकांना श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र दिला, शिर्डी ला गेल्यावर मिळणारी मनशांती आणि आत्मविश्वास यामुळे शिर्डी हे जगभरातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे, साईबाबांच्या बद्दल कुणालाच काही माहिती नाही, म्हणजेच त्यांचे माता पिता तसेच त्यांचा धर्म जात कुणालाच ठाऊक नाही, श्री साईबाबा हे त्यांच्या तरुण वयात शिर्डी मधील एका कडूलिंबाच्या झाडाखाली प्रकट झाले होते.
शिर्डी साईबाबा हे एका पडक्या मशीद मध्ये राहत होते आणि त्यां मशिदीला ते द्वारकामाई असे म्हणत, ते नेहमी सफेद रंगाची कफनी घालत असत, श्री साईबाबांनी त्या काळी पेटवलेली धुनी आजही जळत आहे
साई या शब्दाचा अर्थ मालक असा होतो, साईबाबांसाठी हिंदू आणि मुस्लिम सर्व समान होते, त्यांनी लोकांना धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली, १८ ऑक्टोबर १९१८ च्या दिवशी श्री साईबाबांनी महासमाधी घेतली, साईबाबांच्या कृपेने आज ही भक्तांना त्यांच्या अस्तित्वाचा अनुभव येतो, श्री साईबाबांनी समाधी घेतल्यानंतर त्या ठिकाणी श्री साई मंदिर बांधण्यात आले.
Shirdi Sai Mandir Live Darshan - शिर्डी साईबाबा मंदिर लाईव्ह दर्शन
श्री शिर्डी साईबाबा मंदिर लाईव्ह दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा
श्री सिद्धिविनायक मंदिर मुंबई महाराष्ट्र - Siddhivinayak Mandir Dadar Mumbai Live - Siddhivinayak Mumbai Maharashtra Live - सिद्धिविनायक प्रभादेवी दादर मुंबई लाईव्ह दर्शन
श्री सिद्धिविनायक मंदिर हे श्री गणेशाला समर्पित मंदिर प्रभादेवी दादर मुंबई येथे आहे, हे मंदिर विसाव्या शतकातील असून एका लहान मंदिराचे आज भव्य मोठ्या मंदिरात रूपांतर झाले आहे, सिद्धिविनायक हा नवसाचा गणपती म्हणजेच नवसाला पवणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे.
हे मंदिर मुळात सोमवंशी क्षत्रीय ययाती राजा च्या कुळातील असून सध्याच्या आगरी समाजातील लक्ष्मण विठू पाटील यांनी १९ नोव्हेंबर 1801 रोजी बांधले होते, या मंदिरातील सिद्धीविनायकाची मूर्ति सुबक आणि मनमोहक आहे.
श्री सिद्धिविनायक मंदिर मुंबई लाईव्ह दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा
श्री दगडूशेठ हलवाई गणपती पुणे महाराष्ट्र - Shree Dagdusheth Pune Live - Shree Dagdusheth Ganpati Live - श्री दगडूशेठ गणपती लाईव्ह दर्शन
श्री दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे पुण्यातील प्रसिद्ध मंदिर आहे, या मंदिरात दरवर्षी लाखो भक्त भेट देतात, या मंदीराच्या मूर्तीचा १० मिलियन चा विमा काढलेला आहे, हे मंदिर १३० वर्ष जुने आहे,
सन १८९३ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई नावाचे सुप्रसिद्ध मिठाई चे व्यापारी होते, पुण्यात त्या काळी आलेल्या प्लेगच्या साथीमुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे निधन झाले, त्यानंतर श्री माधवनाथ महाराज यांच्या सल्ल्यानुसार दगडूशेठ यांनी एक दत्तांची मूर्ति आणि एक श्री गणेशाची मूर्ति बनवून घेतली आणि त्यांची नित्य नियमाने पूजा करावयास सुरुवात केली, या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांनी केली होती. गणपतीची ही मूर्ति सध्या पुण्यामध्ये शुक्रवार पेठेतील अकरा मारुति मंदिरात ठेवली असून तिची नित्य नियमाने पूजा केली जाते.
लोकमान्य टिळकांनी १८९६ साली सर्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, त्याच वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ची दुसरी मूर्ति तयार करण्यात आली आणि त्या मूर्तीचा दरवर्षी उत्सव होऊ लागला, थोड्या वर्षात च दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले, परंतु त्या परिसरातील लोकांनी श्री दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव पुढे चालू ठेवला, दुसर्या मूर्तिची अवस्था जीर्ण झाल्यामुळे १९६७ नंतर नवीन मूर्ति बनविण्यात आली.
Shree Dagdusheth Halwai Pune Live Darshan - दगडूशेठ हलवाई गणपती पुणे लाईव्ह दर्शन
श्री दगडूशेठ हलवाई पुणे महाराष्ट्र लाईव्ह दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सातारा महाराष्ट्र - Shree Gondavalekar Maharaj Live - Brahma Chaitanya Gondavlekar Maharaj Live - श्री गोंदवलेकर महाराज लाईव्ह दर्शन
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे एकोणीसाव्या शतकातील एक महान विभूति आहेत, त्यांचा जन्म माघ शुद्ध द्वादशीला शके १७६६ म्हणजेच १८४५ साली सातार्यातील माणगाव तालुक्यातील गोंदवले या गावी झाला, महाराजांचे मूळ नाव श्री गणेश रावजी घुगरदरे असे होते, ते अत्यंत हुशार होते आणि त्यांना रामनामाची फार आवड होती, वयाच्या नवव्या वर्षी ते गुरुशोधार्थ घर सोडून गेले परंतु त्यांच्या वडिलांना ते जेव्हा कोल्हापूरात असल्याचे कळले तेव्हा महाराजांना पुन्हा घरी आणण्यात आले, वयाच्या १२ व्या वर्षी महाराज पुन्हा गुरूंच्या शोधात घरातून निघून गेले, पुढे त्यांनी नांदेड मधील श्री तुकाराम चैतन्य महाराज यांनी गोंदवलेकर महाराजांना आपले शिष्य करून घेतले, तुकाराम चैतन्य महाराजांनी गोंदवलेकर महाराजांचे नाव ब्रह्मचैतन्य असे ठेवले, गुरूंच्या आज्ञे नुसार महाराजांनी हजारो लोकांना रामभक्तीला लावले, महाराजांचे भक्त महाराष्ट्र कर्नाटक आणि उत्तर भारतात सुद्धा आहेत,महाराजांनी ठिकठिकाणी राम मंदिरे उभारून तिथे उपासना करण्यासाठी केंद्रे निर्माण केली.
महाराजांनी असंख्य लोकांना व्यसना पासून दूर केले, गोरगरिबांना आधार दिला, दुष्काळ ग्रस्तांना अन्न धान्याची मदत केली, उपदेश, प्रवचन आणि भजन यांच्या मदतीने लोकांना परमार्थाला लावले, त्यांनी सुशिक्षित लोकांमधील अंधश्रद्धा दूर करून त्यांच्यामध्ये भक्तीबद्दल आदर निर्माण केला, शके १८३५ म्हणजेच २२ डिसेंबर १९१३ या दिवशी महाराजांनी समाधी घेतली.
Shree Gondavalekar Maharaj Samadhi Darshan - गोंदवलेकर महाराज समाधी लाईव्ह दर्शन
श्री गोंदवलेकर महाराज समाधी मंदिर महाराष्ट्र लाईव्ह दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा