Bharat Series Number Plates Marathi - भारत सिरीज नंबर प्लेट्स मराठी


नमस्कार मित्रांनो,

आज आपण BH सिरीज नंबर प्लेट BHARAT SERIES NUMBER PLATE नक्की काय आहे हे जाणून घेऊया.

भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २८ ऑगस्ट २०२१ पासून BH सिरीज नंबर प्लेट लॉंच केली, त्याला आपण ONE NATION ONE NUMBER PLATE असेही बोलू शकतो, ही प्लेट संपूर्ण भारतात चालते म्हणजेच BH सिरीज असलेले वाहन सपूर्ण भारतात कुठेही वापरू शकतो, अशा वाहनाची दुसर्‍या राज्यात स्थलांतर केल्यावर पुन्हा नवीन नोंदणी करण्याची गरज नसते.

जेव्हा एखाद्या व्यक्तीने भारता अंतर्गत एखाद्या दूसर्‍या राज्यात स्थलांतर केले तर त्यांना मोटर वाहन कायदा १९८८ च्या ४७ कलम नुसार प्रथम वर्षी त्याच वाहन क्रमांकावर त्यांचे वाहन दुसर्‍या राज्यात चालविण्यास परवानगी आहे परंतु दुसर्‍या वर्षी त्यांना त्या संदर्भित आरटीओ मध्ये अर्ज करून त्यांच्या वाहनाचा नंबर बदलायला लागत होता, उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीने मुंबई शहरात आरटीओ रजिस्ट्रेशन केले तर त्यांच्या वाहनास MH असा कोड मिळत असे, आणि जर ती व्यक्ति गुजरात राज्यामध्ये स्थलांतरीत झाली तर तिला गुजरात आरटीओ चा GJ हा कोड मिळत असे, परंतु आता अशा वाहनांसाठी भारत सरकार ने नवीन BH सिरीज नंबर प्लेट लॉंच केली आहे, या मध्ये काही नियम भारत सरकारने ठेवले आहेत.


 BH सिरीज चे नंबर मिळविण्यासाठी खालील अटी आहेत.
  • BH सिरीज चा क्रमांक केन्द्र सरकार चे कर्मचारी, राज्य सरकार चे कर्मचारी यांना मिळेल.
  •  BH सिरिज चा क्रमांक सैन्यात असलेल्या लोकांना मिळेल.
  •  ज्या खाजगी कंपनीच्या भारतात ४ किवा ४ पेक्षा जास्त राज्यात शाखा असतील अशा कंपनी मधील लोकांना ज्यांची वारंवार बदली होत असते त्यांना BH सिरिज नंबर मिळेल.


BH सिरीज नंबर मुळे दुसर्‍या राज्यात स्थलांतर केल्यावर पुन्हा त्या राज्यात आरटीओ नोंदणी करण्याची गरज लागणार नाही, फक्त काही ऑनलाइन प्रक्रिया असतील.

आता सध्या वाहनावर असलेल्या नंबर प्लेट वर प्रथम राज्य नंतर आरटीओ कोड आणि नंतर एखादी २ नंबर ची सिरीज जशी AB असू असते आणि नंतर ४ अंकी वाहन क्रमांक असतो. उदाहरणार्थ MH-01-AB-1234 या मध्ये MH हा महाराष्ट्राचा कोड आहे आणि 01 हा मुंबई च्या आरटीओ चा कोड आहे त्या नंतर AB ही वाहनाच्या मॉडेल प्रमाणे वापरात आलेली सिरीज आहे आणि 1234 हा वाहन क्रमांक आहे.

BH सिरीज मध्ये वाहन क्रमांक 23-BH-1234-AB अश्या फॉर्म मध्ये असतो, म्हणजेच 23 हा ज्या वर्षी वाहनाची नोंदणी केली ते वर्ष असते, BH हा भारत सिरीज चा कोड असतो त्या नंतर ४ अंकी वाहन क्रमांक आणि त्या नंतर AB हा वाहनाच्या मॉडेल प्रमाणे असलेला कोड असतो.


भारत सरकारने BH सिरीज का लॉंच केली ? Features of BH Series
  • सध्या असलेली प्रत्येक राज्यातील वाहनांची नोंदणी प्रक्रिया फार किचकट असून निरनिराळी कागदपत्रे जोडावी लागतात.
  • सध्या असलेली संपूर्ण प्रक्रिया ऑफलाइन असून या प्रक्रियेस फार वेळ लागतो, नवीन BH सिरीज नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे.
  • किचकट असलेल्या नोंदणी प्रक्रियेमुळे बरेच लोक दुसर्‍या राज्यात गेल्यावर वाहन नोंदणी करत नाही आणि त्या राज्याला टॅक्स मध्ये नुकसान होते.
नवीन BH सिरीज नोंदणी कशी करावी.
  • नवीन वाहनांसाठी आपण वाहन खरेदी करतानाच BH सिरीज साठी अर्ज करू शकता.
  • जुन्या वाहनांसाठी वाहन नोंदणी असलेल्या आरटीओ मधून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC LETTER आणावे लागते.
  • नवीन आरटीओ मध्ये तुम्हाला कमीत कमी २ वर्षाचा रोड टॅक्स भरावा लागेल.तुम्ही तुमच्या सध्याच्या आरटीओ कडे तुम्ही आधी भरलेल्या कराच्या परताव्यासाठी अर्ज करू शकता, त्या नंतर तुम्ही तुमच्या कागद पत्रांसोबत नवीन BH सिरीज साठी अर्ज करू शकता, कागदपत्रांमध्ये तुमच्या कंपनीशी संबंधित कागद पत्रे आणि तुमचे आधीची वाहन नोंदणी कागदपत्रे आणि स्वताची कागदपत्रे लागतील.


BH सिरीज नोंदणी साठी खाली माहिती दिल्या प्रमाणे टॅक्स भरावा लागेल.  Road Tax for BH Series

१० लाख पेक्षा कमी किंमत असलेल्या वाहनांसाठी  ८% कर भरावा लागेल.
१० ते २० लाख पर्यन्त किंमत असलेल्या वाहनांसाठी  १०% कर भराव लागेल.
२० लाखाहून अधिक किंमत असलेल्या वाहनांसाठी   १२% कर भरावा लागेल.
डीजल इंजिन असलेल्या वाहनावर २% जास्त आणि इलेक्ट्रिक इंजिन असलेल्या वाहनावर  २% कमी कर लागेल.

महत्वाची सूचना - ज्यांनी आधीच्या राज्यात रोड टॅक्स भरला असेल तो टॅक्स त्यांना अर्ज केल्यानंतर परत मिळेल. 

अधिक माहिती साठी MORTH म्हणजेच Ministry of  Road Transport and Highways च्या official वेबसाइट https://parivahan.gov.in/parivahan/ वर भेट द्या.  






Post a Comment

Previous Post Next Post